Agriculture Meteorological Center Forecast : बुलडाणा जिल्ह्यात 14 मार्च ते 16 मार्चला अवकाळी पावसाची शक्यता - बुलढाणा जिल्ह्यात विचित्र वातावरण
🎬 Watch Now: Feature Video
बुलडाणा जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून रात्री हिवाळा आणि दिवसा उन्हाळा वातावरण होते. आरोग्यासोबत पिकाच्या आरोग्याबाबत देखील शेतकरी चिंतेत होता. त्याला आता पुढील काही दिवसात कसा हवामानाचा प्रवास राहणार आहे, हे शेतकरी नेहमी जाणून घेत असतो. हवामान तज्ञांचा कृषी खात्याचा शेतकऱ्यांसाठी सल्ला दिला आहे. भारतीय हवामान खात्याने आज वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात येत्या ३ दिवसांत हवामान मध्ये अवकाळी पाऊस वेग गरजेनुसार सुसाट वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. जिल्हात दि.14,15,16 मार्च दरम्यान मेघगर्जना सह विजांचा कडकडाट अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच या दरम्यान किमान व कमाल तापमानात बदल होणे अपेक्षित आहे. हरभरा परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलीत बंद ठेवावे.
परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची विलंब न करता त्वरित कापणी करावी. सध्याचे कोरडे हवामान व वाढते तापमान लक्षात घेता व पुढील दिवसांमध्ये येणाऱ्या अवकाळी पावसा आधी कापणीस उशीर झाल्यास घाटे तुटून पडल्याने उत्पादनात घट होऊ शकते. गहु पिकात दाणे भरण्याच्या अवस्थेत उंदीर व्यवस्थापन करण्यासाठी उंदीराचे शेतातील पर्यायी अन्न स्त्रोत नष्ट करावेत. तसेच शेतातील बिळे बंद करावीत. भाजीपाला व फळबागांना नियमितपणे ओलीत करावे व ओलितासाठी सुक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होईल व पाण्याचा अपव्यय टाळता येईल. कोंबड्यांच्या शेडमध्ये पक्षांची गर्दी टाळावी, शेडच्या आकारमानानुसार आवश्यक तेवढ्याच कोंबड्या ठेवाव्यात. तसेच मेघगर्जनेसह वारं वादळ व अवकाळी पावसामुळे जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करून ठेवावी. शेतात तयार झालेला मालावर ताड पट्टी टाकून त्याला सुरक्षित करावे शेतात तयार असलेला पालेभाज्या फळे हे सुद्धा खराब होऊ नये म्हणून त्याची देखील ठेवण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. यामुळे त्याची गुणवत्ता ही कायम राहील. हवामान खात्याने दिलेल्या या अलर्टमुळे बळीराजा त्याला पांढरे सोने म्हणजे कापसाने आणि तुरेने यावेळेस पाहिजे तसा भाव दिल्याने. मागील महिनाभरापासून निसर्गाने देत असलेले अलर्ट. आणि अवकाळी पावसाचे शुक्ल कास्ट त्याच्या मागून सुटत नाही आहे. त्यामुळे आता अजून नवीन अलर्ट प्राप्त झाला आहे. त्यावर बळीराजांनी लगेच तयारीला लागून. आपला तोंडाशी आलेला घास कसा सुरक्षित ठेवल्या जाईल.आणि तो बाजारापर्यंत नेला जाईल. याची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.