Live In Relationship : लिव्ह इन रिलेशनशिपपेक्षा विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे अधिक - विवाहबाह्य संबंधांमुळे वाद
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16947309-912-16947309-1668609635927.jpg)
अमरावती - राज्यात सध्या लिव्ह इन रिलेशनशिपचे ( Live in relationship ) अनेक प्रकरण गंभीर वळण घेत असल्याचे उजेडात येत आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या आफताब पूनावाला याने त्याची जोडीदार श्रद्धाची निर्गुण हत्या केल्याच्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. लिव इन रिलेशनशिपमध्ये अमरावती शहर आणि जिल्ह्यात राहणाऱ्या जोडप्यांची संख्या ही अतिशय शुल्लक असून त्याचे कुठे नोंदणी देखील नाही. विवाहबाह्य संबंधांमुळे ( Cases of extramarital affairs ) अनेक कुटुंबात कलह होत असून अशा जोडप्यांमधील वाद ( Disputes due to extramarital affairs ) मिटावा यासाठी कौटुंबिक न्यायालयाच्या वतीने हवे ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील अनेक प्रकरण हाताळणाऱ्या वकील समिधा नागे यांनी 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना स्पष्ट केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST