Buldana Bus Accident: समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल - समृद्धी महामार्गावर बस अपघात
🎬 Watch Now: Feature Video
बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा येथे झालेल्या खासगी बस लक्झरी अपघातात 25 जण मृत्युमुखी पडले तर आठ जण जखमी झाले. (Buldana Bus Accident) या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या खासगी बस विदर्भ ट्रॅव्हल्सच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यावर 140/23 कलम 279,304,337,338,427 आणि स्टेशनमध्ये मोटर वाहन कायदा 184 अन्वय सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. (Bus Accident On Samriddhi Highway)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघात घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे. (case registered against bus driver) योग्यरित्या चौकशी करणे तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रशासनाला दिले आहेत. भरधाव वेगात असणारी बस समृद्धी महामार्गावर असणाऱ्या लोखंडी पोलवर धडकली. त्यानंतर हा अपघात घडल्याचा अहवाल अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे. भरधाव वेगात असणारी ही बस समृद्धी महामार्गावरून धावत असताना रस्ता दुभाजकालगत असणाऱ्या स्टीलच्या खांबाला धडकली. यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसच्या उजव्या बाजूचा चाक डिव्हायडरला धडकताच बसचा टायर फुटला. त्यानंतर ही बस पलटली आणि सिमेंट रोडवर दूरपर्यंत घासत गेली. अतिशय वेगात असणाऱ्या या बसचा डिझेल टँक फुटला आणि आधीच प्रचंड गरम असणाऱ्या बसच्या इंजिनने पेट घेतला. त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण बस जळाली. यावेळी बसचे आपत्कालीन दार आणि खिडकी देखील उघडू शकली नाही.