Video: बहिणीच्या विनयभंगाला भावाने केला विरोध, गुंडांनी बांधून केली मारहाण;व्हिडिओ व्हायरल - मुलीचा विनयभंग केल्याने तरुणाला मारहाण
🎬 Watch Now: Feature Video
प्रतापगड (उत्तर प्रदेश) : राणीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात मुलीचा विनयभंग करणे चांगलेच महागात पडले. याला ५० हून अधिक तरुणांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली यानंतर तरुणाचे अपहरण करून त्याला ओलीस ठेवून मारहाण केली. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी राणीगंज पोलीस ठाण्याचे अध्यक्ष सर्वेश सिंह यांनी सांगितले की, पोलीस सर्वकाही तपास करत आहेत. तर सीओ राणीगंज विनय प्रभाकर साहनी यांनी सांगितले की, आरोपींची ओळख पटली आहे. मारामारीचे ठिकाणही समोर आले आहे. या प्रकरणात पीडितेच्या बाजूने कोणताही तक्रार मिळालेला नाही. तक्रार आल्यानंतर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल. दरम्यान, ईटीव्ही भारत या व्हायरल व्हिडिओची कोणतही पुष्टी करत नाही.