JP Nadda Maharashtra Visit: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यकारिणीची आज पुण्यात बैठक - BJP state executive meeting in pune

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 18, 2023, 10:17 AM IST

पुणे : भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. बुधवारी ते मुंबईत होते. आज भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीची सर्व तयारी झालेली आहे. आजच्या या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. त्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे देखील मार्गदर्शन होणार आहे. बैठकीनंतर सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यसमिती बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रास्ताविक करणार आहे. आजच्या या बैठकीत बूथ सशक्तीकरण अभियानाचा आढावा, मोदी @ नऊ..म्हणजे मोदी सरकारच्या नऊ वर्षांची कारकीर्द नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महा जनसंपर्क अभियानाची घोषणा तसेच राजकीय प्रस्ताव यावर राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन होणार आहे. आजच्या या बैठकीसाठी राज्यातून बाराशे प्रतिनिधी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. बैठकीत विविध संघटनात्मक आणि राजकीय ठराव संमत करण्यात येणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.