कोपरगावात भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने, पोलिसांचा सौम्य लाठीमार - kopargaon bjp ncp party workers
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहीहंडी उत्सवाची स्वागत कमान उभारण्यात येत असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध दर्शविला. मंगळवारी दिवसभर दोन्ही गट आमने सामने आले होते. आणि रात्रीच्या सुमारास भाजपा आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे, काही काळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, अशा घोषणा दिल्या तर भाजप कार्यकर्त्यांनी विवेक कोल्हे व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कोपरगाव शहर पोलीस व शीघ्र कृती दलाचे जवान वेळीच पोहोचले व जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. जमावाला पांगवण्यासाठी पळताना पोलीस निरीक्षक वासुदेव देसले पडून किरकोळ जखमी झाले. दरम्यान ज्या स्वागत कमानीवरून वाद सुरू झाला ती कमान पोलिसांनी लगेचच हटवली आहे. प्रशासनाला जर कमान हटवायची होती तर मग दिवसभर वाट का पाहिली, असा देखील प्रश्न यामध्ये निर्माण होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST