International Yoga Day 2023: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही केला निराधार मुलांसोबत योगा दिवस साजरा - योगा दिवस
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/21-06-2023/640-480-18807891-thumbnail-16x9-pankaja-up.jpg)
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी विभागीय क्रीडा संकुल येथे योगा डे साजरा केला. लहान मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांमध्ये असणाऱ्या मुलांनी योगा डे साजरा केला. यावेळी मणक्याचे आजार दूर झाले. गेले अनेक वर्षे या आजारामुळे त्रस्त होते, औषधांमुळे काहीही फरक पडत नव्हता. मात्र, योगामुळे मला आराम मिळाला. आसन केल्याने शरारतील आजार दूर होतात. जिममुळे होत असलेल्या व्यायामामुळे फायदा होतो. मात्र, योगामुळे अंतर्मनाचा व्यायाम होतो. आपल्याला दिवसभर मोकळे वाटते. ताण तणाव जाणवत नाही, त्यामुळे मी रोज योगा करण्याचा निश्चय केल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. आज संपूर्ण राज्यात आंतरराष्ट्रिय योगा दिवस साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनीही मुंबईत विधानभवनात योगा दिवस साजरा केला.