Abu Azmi Against RSS: मग 'आरएसएस' संघटनेवरही बंदी घाला...आमदार अबू आजमी - अबू आजमीचा आरएसएसविरोधी अजेंडा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 7, 2023, 8:27 PM IST

ठाणे: एकीकडे केंद्र सरकारने देशविघातक व दहशतवादी कृत्यांना अर्थसाहाय्य केल्याचा आरोप असलेल्या 'पीएफआय' संघटनेवर मुस्लिम राष्ट्र बनवण्यात सामील असल्याचा आरोप (Abu Azmi Against RSS) करत त्यांच्यावर बंदी घातली. मात्र दुसरीकडे 'आरएसएस' आणि इतर हिंदू संघटना 'पीएफआय' प्रमाणेच हिंदू राष्ट्र करण्यासाठी (SP MLA Abu Azmi) आटापिटा करत आहेत. तसेच मुस्लिम समुदायालाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे 'आरएसएस'सह इतर हिंदुत्ववादी संघटनावरही 'पीएफआय' प्रमाणेच बंदी घालावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमी यांनी केली आहे. (Hindu Rashtra Agenda of RSS)
आमदार अबू आझमी यांनी महाराष्ट्रात घडलेल्या सध्याच्या राजकीय घडामोडीवरून अजित दादा यांच्यावर निशाणा साधला. अजित पवारांचे नाव न घेता, आमदार अबू आझमी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, एकीकडे संविधानाशी तत्त्वनिष्ठता दाखवायची आणि दुसरीकडे जातीयवादी पार्टीला पाठिंबा देऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायची हे राज्याच्या राजकारणासाठी घातक आहे. महाराष्ट्र राज्यात समाजवादी पार्टी 'एकला चलो रे'च्या भूमिकेत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार अबू आजमी हे भिवंडीत समाजवादी पक्षाच्या एका कार्यक्रमात गुरुवारी रात्रीच्या सुमारास आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना 'आरएसएस'सह सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर जोरदार टीका केली. खळबळजनक बाब म्हणजे, गेल्यावर्षीच नवरात्री व दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क होऊन ठिकठिकाणी छापेमारी करीत होती.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.