Video : पुण्यात पावसाची बॅटींग सुरु; बाबा भिडे पुल वाहतुकीसाठी बंद - खडकवास धरण
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : राज्यसह पुणे शहरात देखील मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून पुण्यातील खडकवासला धरण शंभर टक्के भरले आहे. खडकवास धरणातून (Khadakwas Dam) पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असल्याने पुण्यातील बाबा भिडे पूल हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद (Baba Bhide Bridge Closed) करण्यात आलेला आहे. तसेच नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. बाबा भिडे पूल येथे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने जलपर्णी करण्याचे काम सुरू असून महापालिकेचे (Pune Municipal Corporation cleaning staff) जे कर्मचारी जलपर्णी काढण्याचा काम करत आहे त्यांच्याकडे सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही उपाय योजना नसून पायात साधी चप्पल, रेनकोट घालून हे कर्मचारी जीव धोक्याचे काम करत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST