ATS Raid in Nagpur : बनावट नोटा प्रकरणात नागपुरात 'एटीएस'ची कारवाई, तिघांना घेतलं ताब्यात - 25 लाख रुपयांची रोकड जप्त
🎬 Watch Now: Feature Video


Published : Oct 18, 2023, 8:40 PM IST
|Updated : Oct 18, 2023, 9:41 PM IST
नागपूर : ATS Raid in Nagpur : नागपुरात 'एटीएस'नं कारवाई करत तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. नागपूरच्या हसनबाग परिसरातील परवेज पटेल या व्यक्तीच्या कार्यालयात 'एटीएस'नं ही कारवाई केली आहे. परवेज पटेल याच्यावर अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचे यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. ATS ची ही कारवाई बनावट नोटांच्या संदर्भात केल्याची प्राथमिक माहिती आहे. कारवाई दरम्यान एटीएसनं सुमारे 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली, हे पैसे कुठून आले आणि ही रोकड बनावट आहे की नाही, हे चौकशीनंतर पुढे येणार आहे. कारवाईनंतर एटीएसनं परवेज पटेल याच्यास एकूण तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं (Nagpur Crime News) आहे. एटीएसने बुधवारी (18 ऑक्टोबर) बनावट नोटा प्रकरणात (ATS Action On Fake Notes) नागपुरात कारवाई करण्यात आली आहे.