Astro Year 2023 : 2023 हे वर्षे कोणकोणत्या राशी साठी कसे असेल, हे जाणुन घेऊया - Astro Year 2023

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 12, 2022, 12:22 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

नाशिक 2023 Astro Year 2023 वर्ष हे वर्षे कोणकोणत्या राशी साठी कसे असेल, याची माहिती महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी दिली आहे. How will 2023 be for any zodiac sign मेष, वृषभ, मिथुन, कर्क यांच्यासाठी अत्यंत शुभलाभ देणारे असणार आहे. या राशींच्या व्यक्तींच्या ग्रहस्थिती नुसार नवीन वर्ष त्यांच्या साठी चमत्कारिक राहणार आहे. या वर्षात एखाद्या कामातून चांगला आर्थिक लाभ संभवतो, तसेच अडकलेली कामे देखील या काळात सुटतील, तसेच हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने देखील लाभदायी असणार आहे. 2023 वर्ष हे सिंह, कन्या, तुला, वृश्चिक राशी साठी मिश्रफलीत राहणार आहे. या वर्षात काही गोष्टी मनासारख्या होतील. तर काही गोष्टी मनाविरुद्ध होतील. यामुळे या वर्षात चांगले परिणाम तसेच वाईट असे दोन्ही परिणाम बघायला मिळतील. 2023 वर्ष हे धनु, मकर, कुंभ, मीन या राशींना काही प्रमाणात अशुभफलदायी असणार आहे. थोडक्यात या राशींना निराशा अनुभवयास मिळणार आहे. मात्र या राशींच्या व्यक्तींनी मनोभावे उपासना, आराधना, अनुष्ठान, मंत्र जप केल्यास त्यांना येणाऱ्या अडचणी कमी होऊन, त्यांना देखील हे वर्ष शुभफलदायी असणार आहे, असं महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी म्हटलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.