Gautami Patil News: गौतमी पाटील म्हणते, जो काही गोंधळ घालायचा तो माझ्या लग्नात... - Gautami Patil proggrame
🎬 Watch Now: Feature Video
बारामती : गौतमी पाटील ही कधी तिच्या कार्यक्रमातील गोंधळामुळे तर कधी विधानामुळे चर्चेत असते. तिने विवाह कधी करणार यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. मी लवकर विवाह करणार आहे. अनुरुप वर मिळाला की, सर्वांना निमंत्रण देणार आहे. जो काही गोंधळ घालायचा तो माझ्या लग्नात घाला, अशी गमतीशीर प्रतिक्रिया तिने माध्यमांशी बोलताना दिली. पुढे ती म्हणाली, की येळेवस्ती येथे माझा कार्यक्रम छान झाला. या कार्यक्रमात आजवर कधीही न पाहिलेली महिलांची गर्दी होती. नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या ऑर्केस्ट्राचे उद्धाटन जिल्हा बँक संचालक दत्तात्रय येळे यांनी केले. यात्रा कमिटीने केलेले चोख नियोजन त्यास पोलिस निरीक्षक किरण अवचर व सहकारी पोलिसांनी ठेवलेला बंदोबस्त यामुळे नेहमी गोंधळ व राडा होणारा हा कार्यक्रम शांतपणे पार पडला. यावेळी दहा हजारांहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता. विशेषतः महिलांची संख्या अधिक होती. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीमधील अध्यक्ष राजेश येळे, सचिन माने, सत्यजित ढाळे, भिकाजी नांगरे, संदीप येळे, बंडू नाना, सतीश शेंडगे, जगन करे, मल्हार वावरे, विठ्ठल ढाळे यांसह ग्रामस्थ व स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य पार पाडले. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम, पाव्हणं जेवला का, पाटलांचा बैलगाडा या गाण्यांसह थेट महिला वर्गासमोर जाऊन गौतमी पाटीलने केलेल्या नृत्याला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.