Amritpal Singh Nanded: अमृतपाल सिंग नांदेडमध्ये येण्याची शक्यता; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर - अमृतपाल सिंह

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 21, 2023, 10:57 PM IST

नांदेड: खलिस्तान समर्थक आणि 'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह अद्याप फरार असून पंजाब पोलिसांनी शोधमोहिम राबवली आहे. नांदेडमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. पोलीस सुत्रांना मिळालेल्या माहितीप्रमाणे, फरार असलेला अमृतपालसिंग हा नांदेडमध्ये येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आहे. यामुळे नांदेड पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. 
 

तो सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद:  राज्यातील गुप्तचर यंत्रणा आणि एसआयटीलाही सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. अमृतपालसिंग एक टोलप्लाझा ओलांडत असतानाचा प्रसंग तेथील सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाला आहे. माहितीप्रमाणे अमृतपाल सिंगने आणि कार आणि नंतर कपडे बदलले. सध्या तो शर्ट-पॅंट परिधान करून पगडीशिवाय फिरत आहे. 18 मार्चच्या रात्रीच्या कॅमेऱ्यात हे दृष्य कैद झाले. त्याच्या वाहनामागे इतर कारही येताना दिसत आहे.

हेही वाचा:  GudiPadva 2023 : गुढीपाडव्याच्या दिवशी विशेष ब्रह्म पूजा आणि ध्वज पूजा करण्याचे महत्व; 'असा' आहे मुहूर्त

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.