Aurangzebs row : असदुद्दीन ओवैसींच्या भाषणादरम्यान औरंगजेबच्या घोषणा? पोलीस करणार तपास

By

Published : Jun 25, 2023, 2:07 PM IST

thumbnail

बुलढाणा :  एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांची मलकापुरातील सालीपुरा भागात जाहीर सभा होती. या सभेत असदुद्दीन ओवेसी नागरिकांना संबोधन केले. ओवेसी यांनी समान नागरी कायदा,ठाकरे गटासोबत युती तसेच 307 कलम या एक ना अनेक विषयावर भाष्य केले.  ओवेसी यांचे भाषण चालू असतानाच उपस्थित असलेल्यांपैकी काही जणांनी औरंगजेबच्या समर्थनार्थ नारे दिले. यामुळे पुन्हा एकदा एकदा राज्यामध्ये औरंगजेबचा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. सभेत औरंगजेबच्या नावाच्या घोषणा दिल्याने शहरात तणाव निर्माण झाला. सभेनंतर मलकापूरमध्ये तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. काल सभेमध्ये औरंगजेब चे नारे दिल्याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहे. खरेच सभेमध्ये औरंगजेब यांचे नारे लागले आहेत का नाही ? हे देखील आता पोलीस तपास करत आहे. (व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेबाबत ईटीव्ही भारत पुष्टी करत नाही)
 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.