नवी दिल्ली Moeen Ali Announces Retirement : इंग्लंड क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेसोबत कसोटी मालिका खेळत असून यादरम्यान संघाला मोठा धक्का बसलाय. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. मोईन अलीची निवृत्ती हा इंग्लंडसाठी मोठा धक्का आहे, कारण संघाला पुढील मालिका ऑस्ट्रेलियासोबत खेळायची आहे.
Moeen Ali peaks to Nasser Hussain about international retirement https://t.co/K6GpFZJleo via @MailSport
— Richard Gibson (@richardgibsonDM) September 7, 2024
इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि समालोचक नासिर हुसैन यांच्याशी संवाद साधताना मोईन अलीनं निवृत्तीबद्दल माहिती दिली. मोईन अली म्हणाला, 'इंग्लंड संघासाठी खेळणं हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस होते. आता युवा खेळाडूंनी इंग्लंड संघाला पुढं न्यायला हवं."
कोहलीला 10 वेळा केलंय बाद : 2014 मध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या मोईन अलीनं तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 298 सामने खेळलेत. या दरम्यान त्यानं 6678 धावा केल्या, तर गोलंदाजीत 366 विकेट्स आपल्या नावावर करण्यात तो यशस्वी ठरला. आपल्या ऑफ स्पिन गोलंदाजीनं मोईन अलीनं जगभरातील मोठ मोठ्या फलंदाजांना अडचणीत आणलं, ज्यामध्ये भारताचा महान फलंदाज विराट कोहलीचं नाव येतं. तिन्ही फॉरमॅटमध्ये मोईन अलीनं कोहलीला 10 वेळा बाद केलंय.
मोईन अलीची कारकीर्द : मोईन अलीनं इंग्लंडसाठी 68 कसोटी सामन्यांच्या 118 डावांमध्ये 5 शतकं आणि 15 अर्धशतकांसह 3094 धावा केल्या आहेत. या कालावधित त्यानं 204 विकेट घेतल्या. 138 एकदिवसीय सामन्यांच्या 102 डावांमध्ये 3 शतकं आणि 6 अर्धशतकांच्या मदतीनं इंग्लंडसाठी 2355 धावा केल्या आहेत, तर 111 विकेटही घेतल्या. मोईन अलीच्या टी-20 कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं 92 सामन्यांच्या 75 डावांमध्ये 7 अर्धशतकांच्या मदतीनं 1229 धावा करत 51 विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा
- 'या' शहरात घातली क्रिकेटवर बंदी, खेळताना आढळल्यास भरावा लागणार हजारो रुपये दंड - Ban on Cricket
- भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार? अमित शाह यांच्या वक्तव्यानं चित्र स्पष्ट - Amit Shah on Champions Trophy 2025
- 'बाहुबली' रोहित शर्मा... जिममध्ये एका हातानं जड टायर खेळण्यासारखा उचलून फेकला, पाहा व्हिडिओ - Rohit Sharma Fitness