Ajit Pawar Rally In Beed : 'बाप तो बाप असतो'...अजित पवार यांच्या बीडमधील सभेपूर्वी लागले बॅनर - बीड शहरामध्ये बॅनरबाजी
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 27, 2023, 1:12 PM IST
बीड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची 17 ऑगस्टला बीडमध्ये सभा झाली. या सभेनंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होत आहे. मात्र या सभेअगोदर बीड शहरामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. या बॅनरबाजीमध्ये शरद पवार यांचा फोटो वापरल्याचं आपल्याला अनेक बॅनरवरती पाहायला मिळत आहे. बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी हे बॅनर आपला फोटो लावून त्यावर 'बाप तो बाप असतो' असे बॅनर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लावण्यात आले आहे. या बॅनरवर 'बाप तो बाप असतो' हा उल्लेख केल्यामुळे या बॅनरकडं सर्वांचेच लक्ष वेधलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील काही मंत्री येणार असल्यानं बीड शहरात अनेक बॅनर लावण्यात आलेले आहेत. या प्रत्येक बॅनरवरती शरद पवार यांचे फोटो लावण्यात आले आहेत. शरद पवार यांनी सांगून सुद्धा त्यांच्या फोटो लावण्यात आलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा फोटोचा वाद चव्हाट्यावर येतोय की काय असाच प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहे.