आयटीची नोकरी गेली तरी हिंमत कायम! लालबागला लावला स्टॉल; १० दिवसात ५० हजार - A stall was set up at Lalbagh
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला लाखो भावीक भेट देतात. हे भाविक तासंतास रांगेत उभे असतात. या भाविकांना चहा पाणी आणि खाण्याची व्यवस्था होण्यासाठी येथील स्थानिक रहिवाशांकडून या दहा दिवसांमध्ये स्टॉल लावले जातात. असेच, एक स्टॉल आहे जे आयटीची नोकरी गेलेल्या संजय धामापूरकर यांनी लावलेला आहे. येत्या दहा दिवसांत आपल्या घराचे खर्च चालवण्यासाठी यामधून पन्नास हजार रुपयापर्यंत उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे. त्याचबरोबर येथील रहिवाशांनी ही जे स्टॉल लावले आहेत त्यांनाही अशाच प्रकारचा प्रतिसाद मिळेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST