International Yoga Day : बाईपण भारी ! 'गेट वे ऑफ इंडीया'वर नऊवारी साडी नेसत महिलांनी केला योगा - गेटवे ऑफ इंडियावर महिलांनी योगासने केली

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 21, 2023, 2:19 PM IST

मुंबई : आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. देशभरात योगा करत आजचा दिवस साजरा करण्यात आला. कोणी झाडावर, तर कोणी पाण्यात तरंगत योगा केला. मुंबईतील 90 महिलांना मात्र कमालीचा योगा केला.  गेटवे ऑफ इंडियासमोर 90 महिलांनी  नऊवारी नेसत योगा केला.  भारतीय जनता पक्षाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमात सहभागी होण्याचा आवाहन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले होते. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.  जगभरात योगादिन साजरा केला जातो. आपल्या आरोग्यासाठी योगा किती आवश्यक आहे, याची जागृती करत आजचा दिवस साजरा केला जातो. आज भाजपकडून महिलांना नऊवारी घालून योगा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. महिलांसोबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही योगसने केली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.