Hawala Money Recovered : पोलिसांनी कारमधून 2 कोटी 60 लाख रुपये हवाला रक्कम केली जप्त, दोन आरोपी ताब्यात - 2 Crore 60 Lakh Hawala Money Recovered
🎬 Watch Now: Feature Video
चित्तोडगड कोतवाली पोलीस (chittorgarh police Action) ठाण्याने सायंकाळी उशिरा नाकाबंदी दरम्यान कारवाई करत, एका आलिशान कारमधून (Luxury Car In Chittorgarh) अडीच कोटींहून अधिक हवाला रक्कम (2 Crore 60 Lakh Hawala Money Recovered) जप्त केली. याप्रकरणी कार चालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघेही उदयपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. कार चालकाने आपले नाव रमेश कुमार, रा. बलुवा पोलीस स्टेशन, शारदा जिल्हा, उदयपूर असल्याचे सांगितले. तर दुसऱ्या आरोपीचे नाव उत्तमजीत सिंग रा. उदयपूर आहे. पोलिसांनी नोटांची मोजणी केली असता, एकूण 2 कोटी 60 लाख रुपये बाहेर आले. चौकशीत आरोपींनी कोटा बिजोलिया येथून उदयपूर, गुजरातकडे पैसे घेऊन जाण्याचे सांगितले आहे. याप्रकरणी पोलीस कारवाई करत, दोन्ही आरोपींची चौकशी करत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST