Junagadh Rain : जुनागडमध्ये 3 तासात 10 इंच पाऊस, गुरे, वाहने गेली वाहून, पहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
जुनागड (गुजरात) : गुजरातच्या जुनागडमध्ये मुसळधार पावसामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे 3 तासात 10 इंच पाऊस पडल्याने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक वाहने पाण्यात वाहून गेली आहेत. अवघ्या दोन तासात मेघराजाने एवढा धुमाकूळ घातला की संपूर्ण जुनागड शहर समुद्रात बदलले आहे. लोकांच्या घरातही पाणी शिरले आहे. जुनागडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक प्राणी पाण्यात वाहून गेल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. गेल्या 24 तासात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. गिरनार पर्वतावर सुमारे 14 इंच पाऊस झाला. त्यामुळे डोंगराच्या माथ्यावरून पाणी शहरात शिरले. परिणामी जुनागडमध्ये सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. पहा हा व्हिडिओ..