Astrological Importance of Holi : होळीच्या पूर्वसंध्येला दीड वर्षानंतर राहू-केतू बदलणार राशी, जाणून घ्या काय होणार परिणाम? - Astrological Importance of Holi

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 16, 2022, 10:58 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

पुणे - चैत्र महिन्याच्या पंधरा दिवस आधी होळी हा ( Holi celebration in Pune ) सण साजरा केला जातो. होळीमध्ये आपल्या मनातील सगळ्या वाईट गोष्टीं दहन करायचे असते. निसर्गदेखील याच काळामध्ये पानगळ सुरू करतो. याचा अर्थ आपल्याकडे जीर्ण झाले किंवा अशा गोष्टी सोडून द्याव्यात. होळीच्या पूर्वसंध्येला ज्योतिषशास्त्रीयदृष्टीनेदेखील ( astrological importance of Holi ) खूप महत्त्व आहे. कारण की तब्बल दीड वर्षानंतर राहू-केतू आपली राशी ( Rahu Ketu position ) बदलली आहे. वृषभ राशीचा राहू मेष राशीमध्ये म्हणजे काळ पुरुषाच्या कुंडलीच्या प्रथम घरांमध्ये प्रवेश करत आहे. तर केतु हा ग्रह वृश्चिक राशीमधून तूळ राशीमध्ये प्रवेश करत आहे. यामुळे विविध राशींवर परिणाम होणार आहे. मुख्यत्वे ज्यांना राहुची किंवा केतूची महादशा सुरू आहे, त्यांच्यासाठी हा काळ कठीण जाईल. बँका आणि आर्थिक संस्था या कालावधीमध्ये डबघाईला येतील. वृषभ, कन्या, मकर, कर्क, वृश्चिक, मीन या राशींना हे राश्यांतर प्रभावीत करणार आहे. लोकांनी शिव शंकराची पूजा करावी, यामुळे त्रास कमी होईल, असे ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर ( Astrologer Shedeshwar Martkar ) यांनी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.