VIDEO : पाणीटंचाईच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे घंटानाद आंदोलन - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर पाणीटंचाईच्या विरोधात आज घंटानाद आंदोलन करण्यात आले. शिवाजीनगर परिसरात सातत्याने पाणीटंचाई, पाणीपुरवठा बंद असणे, कमी दाबाने पाणी पुरवठा होणे, अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. सातत्याने होणाऱ्या या त्रासाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आवाज उठवत आज महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनानंतर पुणे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे श्री. अनिरुद्ध पावसकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. जर येत्या काही दिवसात शिवाजीनगर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन घेण्यात येईल, असा इशारा या आंदोलन प्रसंगी देण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST