Hijab Issue : हिजाबप्रकरणी कर्नाटक न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत - शमसुद्दीन तांबोळी - हिजाब प्रकरण शमशुद्दीन तांबोळी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 15, 2022, 3:46 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

पुणे - हिजाब प्रकरणावर ( Hijab Case ) आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जो निर्णय दिला आहे. त्यानिर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हिजाब हा इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नसून तो परंपरेचा एक भाग आहे. त्यामुळे न्यायालयाने जो काही निर्णय दिला आहे. तो योग्य आहे. शिक्षण संस्थेने जर ड्रेसकोड किंवा गणवेश ठरवून दिला असेल तर विद्यार्थ्यांनी त्याच पालन करण गरजेचं आहे, असे मत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे ( muslim satyashodhak mandal )अध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी यांनी व्यक्त केले आहे. ( muslim satyashodhak mandal president shamsuddin tamboli ) त्याचबरोबर अनेक मुस्लिम देशांमध्ये देखील हिजाब बंदी असून त्या त्या देशांमध्ये देखील त्या त्या नियमावलीच पालन करतात. तर मग धर्मनिरपेक्ष भारतात हिजाबसाठी आग्रह करणे हे प्रगतीचे लक्षण नाही, असंदेखील यावेळी तांबोळी म्हणाले. हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. यानंतर ईटीव्ही भारत प्रतिनिधीने शमशुद्दीन तांबोळी यांच्याशी संवाद साधला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.