VIDEO : राज्याच्या अर्थसंकल्पातून तरुणांना काय हवंय, पाहा, काय म्हणतेय तरुणाई? - अर्थमंत्री अजित पवार

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 11, 2022, 10:13 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

मुंबई - शुक्रवारी 11 तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे. ( Maharashtra Budget 2022 ) राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार ( Finance Minister Ajit Pawar ) हा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात मुंबईच्या तरुणांना काय अपेक्षित आहे, याबाबत ईटीव्ही भारतने या तरुणाईशी संवाद साधला. ( youth reactions on maharashtra budget 2022 ) मुंबईकर योगेश जाधव सांगतात की, "हा संकल्प जनतेच्या पैशाची बचत करण्यासाठी असतो मात्र मागील वेळी केंद्र सरकारने पेट्रोलवरील कर कपात केली होती. सोबतच इतर राज्यांनीही त्यावेळी कर कपात केली. पण, महाराष्ट्राने तसं केलं नाही असं का? वरून यांनी घरावरील स्टॅम्पड्युटी आधीच वाढवून ठेवली आहे. त्यामुळे अर्थसंकल्प हा सर्वमान्य जनतेच्या पैशांची बचत करणारा असावा." तसेच किरण रेवाळे सांगतात, "मागच्या दोन वर्षात कोविड आणि वादळ, महापूर यांसारख्या संकटांत आमचा कोकणी माणसाचं खूप नुकसान झालंय तो पूर्ण भरडला आहे. जनतेला यातून कुठंतरी दिलासा मिळाला हीच अपेक्षा आहे."
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.