VIDEO : जेव्हा नारळाच्या झाडावर माकड फोन उचलतो... पाहा, पुढे काय होतं?
🎬 Watch Now: Feature Video
पुद्दुचेरी - पुडुचेरी फार्मर्स मार्केटजवळ अनेक नारळाची दुकाने आहेत. ( Farmers Market Coconut Shops ) यामुळे याठिकाणी नेहमीच गर्दी असते. अशाच येथील नारळाच्या दुकानात एक माकड तिथे आला आणि त्याने खेळकरपणे दुकानमालक महिलेचा महिलेचा मोबाईल उचलला. इतकेच नव्हे तर माकड तो फोन घेऊन नारळाच्या झाडावर चढला. त्या माकडाला फोन परत देण्यासाठी खाणाखुणा करत होते. मात्र, तो आला नाही. मजेशीर म्हणजे जेव्हा या माकडजवळ असलेल्या फोनवर कॉल आला, तेव्हा त्याने फोन घेऊन बोलण्याचाही प्रयत्न केला. याठिकाणी एक गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. तर ज्या महिलेचा मोबाईल होता ती महिलाही थक्क झाली होती. अखेर ती महिला परत आपल्या दुकानात आल्यानंतर सुमारे तासाभरानंतर माकडाने तो मोबाईल जिथून घेतला होता तिथे सोडला आणि निघून गेला. पाहा, संबंधित व्हिडिओ...
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST