VIDEO : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मनसेने पावनखिंड चित्रपटाची तीनशे मुलांना तिकीट - पावनखिंड चित्रपट
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - बोरिवली पश्चिम येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 300 हून अधिक शाळकरी मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकथेवरील पावनखिंड चित्रपट पाहण्यासाठी मॅक्सस मॉलची तिकिटे देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चरित्र पाहून मुलांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे. यापूर्वीही हा चित्रपट शिक्षकांना दाखवण्यात आला होता. शाळकरी मुलेही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याच्या वेशात दिसली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकथेतून प्रेरणा घेण्यासाठी मुलांना सीडीही देण्यात आल्या. मनसे सरचिटणीस नयन कदम यांनी मुलांना चित्रपट पाहण्यासाठी तिकीट दिले. यावेळी मनसे मुंबई सरचिटणीस नयन कदम, विभागप्रमुख प्रसाद कुलपकर, अमर भट्टाचार्य विधि उपाध्यक्ष, शाखाप्रमुख महेश नर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST