Jayant Patil Reaction On Nawab Malik : हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थे विरोधातील - मंत्री जयंत पाटील - मंत्री जयंत पाटील
🎬 Watch Now: Feature Video
सोलापूर - हा आणखी एका सत्तेचा दुरुपयोग करण्याचा प्रकार आहे. कोणतीही नोटीस न देता राज्यातील एका मंत्र्यांना घेऊन जाणे, ही सर्वच गोष्टीची पायमल्ली आहे. हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. अलीकडच्या काळात नवाब मलिक यांनी अनेक प्रकरणे बाहेर काढली होती. त्याची प्रतिक्रिया म्हणून कदाचित जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे. वेळोवेळी त्यावर आवाज उठवला होता. म्हणून कदाचित नवाब मलिक यांना अडचणीत आणण्याचे हे काम असेल, असेही जयंत पाटील म्हणाले. जाणीवपूर्वक नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम सुरू झाले आहे, असेही जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST