Leopard Cub Attacked Woman : घरातील खाटेखाली लपून बसले होते बिबट्याचे पिल्लू.. पाहताच केला हल्ला.. अन् झालं 'असं'

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 7, 2022, 5:26 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

चंद्रपूर : जिल्ह्यातील सावली तालुक्यात उसेगाव (Usegaon Tahsil Chandrapur ) येथे एका घरात बिबट्याचे पिल्लू घुसल्याने एकच खळबळ ( Leopard Cub Entered In House ) उडाली. भगवान आवारी यांच्या घरात पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्याचे पिल्लू घुसले होते. सकाळी साडेआठच्या सुमारास या बिबट्याला पकडण्यात यश ( Leopard Cub Caught By Forest Department ) आले. काही दिवस देखरेखीत ठेवून लवकरच त्याची मोकळ्या अधिवासात मुक्तता केली जाईल, अशी माहिती चंद्रपूर वनविभागाचे विभागीय अधिकारी प्रशांत खाडे यांनी दिली. उसेगाव येथे आवारी यांच्या घरी चार जण घरात झोपले होते. पहाटे भगवान यांची आई सिंधुबाई उठल्या. तेव्हा खाटेच्या खाली काहीतरी असल्याची चाहूल लागली. तेव्हा बघितले असता सिंधूबाई यांची सून शशिकला यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न ( Leopard Cub Attacked Woman ) केला. तिने प्रतिकार करीत जीव वाचविण्यासाठी घराबाहेर धाव घेतली. या घटनेची माहिती उपसरपंच सुनील पाल यांना दिली. त्यांनी वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर सावली येथील वनरक्षकाने पाहणी केली. आज सकाळी 8 वाजता वनविभागाची टीम आणि इको प्रो संघटनेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या बारा मिनिटातच या बिबट्याला पकडण्यात यश आले. सुमारे एक ते दीड वर्षांचा हा बिबट्या असावा, अशी माहिती देण्यात आली. त्याची संपूर्ण तपासणी केल्यावर त्याला वन्य अधिवासात सोडण्यात येणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.