Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला आंतरराष्ट्रीय रेडियो संस्था, 3 हजार विद्यार्थ्यांनी केलाय संपर्क - International radio organization
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - गेल्या काही महिन्यांपासून वर्तविण्यात आलेली रशिया-युक्रेन युद्धाची ( Russia Ukraine War ) भिती अखेर खरी ठरली. रशियाने गुरुवारी युक्रेनवर चौफेर हल्ले केले. त्यात ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाले आहे. युक्रेनमध्ये 15 हजारहून अधिक विद्यार्थी हे अडकले असून भारतात परत येण्यासाठी हे विद्यार्थी आवाहन करत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी रेडिओ ( REDIO ) ( Rescuing Every Distressed Indian Overseas ) या संस्थेने पुढाकार घेतला आहे. या संस्थेने ट्विटर द्वारे तेथील विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यात तीन हजार भारतीय विद्यार्थ्यांनी रेडिओ संस्थेशी संपर्क साधला आहे.या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन देखील सुरु करण्यात आली आहे. रेडिओच्या ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह धनश्री पाटील यांच्याशी बातचीत केलीये आमच्या प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST