Car accident viral video : ग्वाल्हेरमध्ये भरधाव वेगातील कारने चार जणांना उडविले, चौघेही गंभीर - Car accident viral video
🎬 Watch Now: Feature Video
ग्वाल्हेर- मध्य प्रदेशात ग्वाल्हेर पोलीस स्टेशन हद्दीत अनियंत्रित कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार तरुणांना ( car hit four youth ) धडक दिली. ही टक्कर इतकी जोरदार होती की चारही तरुण हवेतून उडून दूरवर ( Accident caught in cctv )पडले. चौघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात एक पांढऱ्या रंगाची कार भरधाव वेगाने येऊन युवकांना कशी धडकते हे स्पष्टपणे दिसत आहे. जखमींच्या तक्रारीवरून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात ( gwalior Accident Video viral ) आला. मात्र अद्यापपर्यंत आरोपी पकडण्यात आलेला नाही. कारच्या क्रमांकाच्या आधारे पोलीस त्याच्या मालकाचा शोध घेत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST