कोल्हापुरात कुऱ्हाडीने घाव घालून शेतकऱ्याचा खून; शेतजमिनीच्या वादातून घडली घटना - मुनाफ सत्तारमेकर शेतकरी खून
🎬 Watch Now: Feature Video

कोल्हापूर - शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याचा खून करण्यात आल्याची घटना ( Farmer brutal murder killed ) घडली आहे. हातकणंगले तालुक्यातील साजणी इथे ही घटना घडली. मुनाफ सत्तारमेकर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तर संशयित आरोपी नितिन कोण्णुरे स्वतःहून पोलीस ठाण्यात दाखल ( Hatkangale Police ) झाला आहे. बुधवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हातकणंगले तालुक्यातील साजणी येथील संकाण्णा मळ्यातील शेतकरी नितिन कोण्णुरे यांनी फायनान्स कंपनीकडून शेती तारण ठेवून कर्ज ( land buy through finance company auction ) घेतले होते. मात्र, काही कारणाने त्यांच्याकडून कर्ज परतफेड करणे शक्य झाले नाही. त्यामुळे संबंधित फायनान्स कंपनीने नितिन कोण्णुरे यांची जमीन लिलावात कबनुर ही मुनाफ सत्तारमेकर यांना विकली होती. तेव्हापासूनच कोण्णुरे आणि सत्तारमेकर यांच्यात वाद सुरू ( murder due to land dispute ) होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST