1993 Bomb Blast : २९ वर्षांनंतरही बॉम्बस्फोटातील पीडिताला मिळेना न्याय, अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत - Victims of 1993 Mumbai chain bombings

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 12, 2022, 4:07 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

मुंबई - १९९३च्या बॉम्बस्फोटातील पीडित ( Victims of 1993 Mumbai chain bombings ) कीर्ती अजमेरा हे २९ वर्षांनंतरही न्याय आणि नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. १२ मार्च १९९३ रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये त्यांच्यासमोर बॉम्बस्फोट ( Bombay Stock Exchange bombing ) झाला. तेव्हा कीर्ती अजमेरा त्या स्फोटात बचावले. या घटनेला आज २९ वर्षे झाली आहेत. त्यांच्यावर ४० हून अधिक शस्त्रक्रिया झाल्या असून, अद्याप त्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही असे त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना सांगितले आहे. अजमेरा यांनी सांगितले की, “त्यांच्या शरीराची उजवी बाजू अजूनही दुखत आहे, ४०हून अधिक ऑपरेशन झाले आहेत, काचेचे तुकडे अजूनही शरीरातून बाहेर पडत आहेत, आतील कानाचा पडदा काम करत नाही. साखळी बॉम्बस्फोटानंतर सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही, उपचारासाठी ४० लाखांहून अधिक खर्च झाला आहे. अजमेरा यांचे म्हणणे आहे, की त्यांना आशा आहे, की सरकारकडून कोणीतरी माझा दरवाजा ठोठावेल, जो वर्षापूर्वी मला मिळणाऱ्या भरपाईबद्दल माझ्याशी बोलेल.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.