Satish Kaushik passes away : हसते खेळते सतिश कौशिक अचानक गेल्याने नातेवाईकांसह सहकलाकार व्याकुळ - हसते खेळते सतिश कौशिक
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/640-480-17942919-thumbnail-4x3-lkaj.jpg)
मुंबई - ज्येष्ठ अभिनेता सतिश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांच्या सहकालाकारांना मोठा धक्का बसला आहे. होळीच्या सणाला एकत्र मजामस्ती केलेले सतिश आज आपल्यात नाहीत यावर अनेकांचा विश्वासच बसायला तयार नाही. त्यांची मोठी बहिण सतिश यांच्या आठवणीने व्याकुळ झालेली पाहायला मिळाली. तर त्यांचे अभिनयातील कायम सोबती असलेले अनुपम खेर यांनीही हा मोठा धक्का असल्याचे म्हटलंय. काल रात्री १० च्या सुमारास ते झोपायला गेले होते. मात्र श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांनी बाराच्या सुमारास त्यांच्या मॅनेजरला बोलावले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे मॅनेजरने सांगितले. देशभरातून प्रेक्षक आणि कलावंत त्यांच्या आठवणीने अश्रू ढाळत आहेत. अनेक कलाकार त्यांच्या आठवणी माध्यमांसमोर सांगत आहेत. या व्हिडिओत तुम्ही हसत खेळत होळी खेळणारे सतिश कौशिक ते आज ते हयात नसल्याच्या धक्क्यात असलेले सहकारी यांना पाहणार आणि ऐकणार आहोत.