निर्दयी : रेल्वे स्थानकावर पोलीस जवानाची वृद्धाला लाथाबुक्काने मारहाण, Video व्हायरल - Police Jawan
🎬 Watch Now: Feature Video
जबलपूर (मध्यप्रदेश) - मध्य प्रदेशातील जबलपूर येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पोलिसांचा गणवेश घातलेला एक जवान एका वृद्धाला निर्दयीपणे लाथाबुक्काने मारहाण करताना दिसत आहे. यादरम्यान वृद्धांनाही प्लॅटफॉर्मवर ओढले गेले. हा व्हिडिओ जबलपूर रेल्वे स्टेशनचा आहे. जीआरपी आणि आरपीएफ दोघेही व्हिडिओच्या तपासात गुंतले आहेत. पोलीस जवानाची ओळख अद्याप पटलेली नाही. प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनमधील एका प्रवाशाने हा व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल केला.( Police Jawan beat up elderly In Jabalpur ) ( Dragged Elderly on Railway Platform ) ( Elder man Beaten Video viral )
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST