Girish Vishwa Dholak player : प्रसिद्ध ढोलक वादक गिरीश विश्वा इस्रायलमधून सुखरुप परतले, सांगितला हल्ल्याचा भीषण अनुभव; Watch video - ढोलक व तालवादक गिरीश विश्वा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 7:39 PM IST

Updated : Oct 10, 2023, 9:10 PM IST

मुंबई : इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाला सुरू होऊन चार दिवस झाले. मात्र तेथील परिस्थिती अद्यापही बिकटच आहे. मृतांची संख्या १,६०० च्या पुढे गेली असून, दोन्ही बाजूंनी हजारो लोक जखमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी, बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरूचा इस्रायलमधून सुखरुप परतली. ती तिथे चित्रपटाच्या शूटींगला गेली होती. नुसरत प्रमाणेच, इंडियन आयडल, सारेगामापा आणि टेलिव्हिजनवरील इतर अनेक सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो मधील ढोलक व तालवादक गिरीश विश्वा आणि त्यांचा मुलगा मौसम विश्वा युद्धजन्य इस्रायलमध्ये अडकले होते. ते काल (९ ऑक्टोबर) भारतात सुखरुप परतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी एका व्हिडिओद्वारे इस्रायलमध्ये झालेल्या हल्ल्याचा भयानक अनुभव सांगितला. 'ईटीव्ही भारत'ला हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ मिळाला आहे. या व्हिडिओमध्ये पाहा काय म्हणाले गिरीश विश्वा आणि मौसम विश्वा...

Last Updated : Oct 10, 2023, 9:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.