Gadkari trailer launch : देवेंद्र फडणवीस यांना नितीन गडकरी राज कपूरसारखे का वाटतात? 'गडकरी' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चप्रसंगी मिळालं उत्तर - Devendra Fadnavis
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 17, 2023, 11:45 AM IST
|Updated : Oct 17, 2023, 4:38 PM IST
नागपूर - Gadkari trailer launch : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित 'गडकरी' या चित्रपटाचा ट्रेलर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात जारी करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे व भारतीय क्रिकेटपटू उमेश यादवदेखील उपस्थित होते. आर एस एसचे स्वयंसेवक नितीन जयराम गडकरी ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पर्यंतचा जीवनप्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात करण्यात आला आहे. अगदी त्यांच्या तारुण्यातील उमेदीचा,संघर्षाचा काळ आणि त्यानंतर विकास पुरुष ते रोडकरी, पूलकरी अशी ओळख रुढ होण्यापर्यंतची यशोगाथा 'गडकरी' चित्रपटात बघण्यास मिळणार आहे. अभिजीत मुजुमदार प्रस्तुत या चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केलं आहे. तर निर्माते अक्षय देशमुख आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची व्यक्तिरेखा राहुल चोपडा यांनी साकारली आहे. येत्या २७ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटात नितीन गडकरी यांच्या पत्नीची म्हणजेच कांचन गडकरी यांची भूमिका ऐश्वर्या डोरले यांनी साकारली आहे. या व्यतिरिक्त या चित्रपटात नितीन गडकरी यांच्या सहकाऱ्यांच्या आणि मित्रांच्या भूमिकेत अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख हे कलाकार दिसतील. या एक पत्रकाराची भूमिका असून तृप्ती प्रमिला केळकर हिने साकारली आहे. अनुराग राजन भुसारी दिग्दर्शित 'गडकरी' हा राजकीय व्यक्तिमत्त्वाचा चरित्रपट येत्या २७ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'गडकरी' या चित्रपटाची कथा, पटकथाही अनुराग राजन भुसारी यांची असून अनुराग भुसारी, मिहिर फाटे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
नितीन गडकरी राज कपूर सारखे : फडणवीस - नितिन गडकरी यांचा 'नेवर डाय एटीट्यूड' हा खरंच अद्भुत आहे. नितीन गडकरींनी आपल्या जीवनात कधीही हार मानली नाही. स्वतःला मी भाग्यवान मानतो की, माझ्या बालपणापासून मी त्यांना काम करताना बघत आलो. त्यांच्या जीवनात कितीतरी चढ-उतार आले, पण ते कधी खचले नाहीत. त्यांचा जीवनप्रवास हा प्रेरणादायी आहे. तो एका चित्रपटात पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे निर्मात्यांना दुसरा पार्ट हा काढावा लागेल, असे ते म्हणाले आहेत. नितीन गडकरी हे राज कपूर सारखे आहेत, त्यांची स्वप्न ही खूप मोठी असतात, असेही प्रशंसोद्गार फडणवीस यांनी काढले.
हेही वाचा -
1. Hema Malini 75th Birthday : हेमा मालिनींच्या 75 व्या वाढदिवसाला सेलेब्रिटी स्टार्सची मांदियाळी
3. Leo Movie : विजय थलपथीला सुपरस्टार रजनीकांतनं दिल्या 'लिओ' चित्रपटासाठी शुभेच्छा...