Girish Mahajan Reply Sanjay Raut : 'खोटे बोल पण नेटाने बोल', महाजनांची संजय राऊतांवर टीका - गिरीश महाजन मराठी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - खोटे बोल पण नेटाने बोल ही म्हण संजय राऊत यांना तंतोतंत लागू होते. संजय राऊत यांनी आतापर्यंत ज्या डरकाळ्या फोडल्या त्यातील एकही गोष्ट सत्य झाली नाही. केवळ वल्गना करत असून प्रसिद्धीसाठी मोठ्याने ते बोलत आहेत. मात्र, आता सर्व कागदपत्रांची तपासणी होईल त्या नंतर सर्व समोर येईल. काहीतरी असल्याशिवाय ईडी कार्यवाही करून प्रॉपर्टी पर्यंत जाणार नाही. त्यांचे पाप पुण्य राज्याच्या समोर आले आहे. त्यांना आता कुठलीही सहानुभूती मिळणार नसल्याची टीका भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली ( Girish Mahajan Reply Sanjay Raut ) आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST