VIDEO : दगडूशेठ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास - दगडूशेठ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. प्रत्येक सीझनमध्ये विविध फळांची आरास दगडूशेठ बाप्पाला केली जाते. आता द्राक्षाचा सीझनमध्ये काळ्या आणि पिवळ्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजला होता. मंदिराच्या गाभाऱ्यासह संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. द्राक्षाच्या हंगामात प्रथमच अशा पद्धतीची आरास मंदिरात केली गेली. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व केमिकल विरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. ही द्राक्षेनंतर भाविक, अनाथाश्रम तसेच वृद्धाश्रमात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. सह्याद्रीच्या शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वीच हा उपक्रम करण्यासाठी द्राक्षे देऊ केली होती, मात्र करोनामुळे आलेल्या निर्बंधांमुळे ते शक्य झाले नव्हते. मात्र या वर्षी मोठ्या प्रमाणावर हा उपक्रम केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST