मंत्री कपिल पाटील यांच्या 'कपिलोत्सव' कार्यक्रमात महिलांची साडीसाठी तुफान गर्दी, व्हिडिओ व्हायरल - कपिलोत्सव महिला गर्दी
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कपिलोत्सव‘ हा भव्य कार्यक्रम भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथे काल सायंकाळच्या सुमारास पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांच्या उपस्थितीसाठी आकर्षक साड्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे, महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचे दिसून आले. साडी घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कार्यक्रमात महिलांसाठी लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. लकी ड्रॉच्या माध्यमातून निवड करून महिलांना इलेक्ट्रिक स्कुटर, पैठणी साडी, मोबाईल अशी पारितोषिके देण्यात आली. खाद्यपदार्थ स्पर्धा, महारक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर आणि महिला मेळावा, अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः महिलांची संख्या हजरोच्या घरात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST