VIDEO : वसईतील कळंब पोल्ट्रीफार्ममध्ये कोंबडीच्या पिल्लूला पाहायला गर्दी - वसईतील कळंब पोल्ट्रीफार्ममध्ये कोंबडीच्या पिल्लूला पाहायला गर्दी
🎬 Watch Now: Feature Video
विरार-वसई : कोंबडीला दोनच पाय असतात, हे सगळ्यांना माहीत आहे. कोंबडीला चार पाय असतात, असे कुणी आपल्याला सांगितले तरी आपला त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र, वसईतील कळंब गावातील एक पोल्ट्री फार्म सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. ( crowd at vasai kalamb poultry farm ) रोज शेकड्यांनी लोक याठिकाणी कोंबडी खरेदीसाठी नव्हे तर एका कोंबडीच्या पिल्लाला पाहण्याकरता गर्दी करतायत. नुकत्याच जन्मलेल्या कोंबडीच्या पिल्लाला चक्क चार पाय आहेत. त्यामुळेच हे नवल बघण्याकरता या ठिकाणी गर्दी होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST