Live CCTV : पोलीस अधिकाऱ्याच्या कारने 2 मुलींना चिरडले, एकीचा मृत्यू तर दुसरी गंभीर - वेदनादायक रस्ता अपघात
🎬 Watch Now: Feature Video
जालंधर - जिल्ह्यातील धन्नो वाली गेट समोर महामार्गावर सकाळी एक वेदनादायक रस्ता अपघात घडला. यात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे. झखमी मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माहिती देताना, अपघात पाहणाऱ्या व्यक्तींने सांगितले की, सकाळी 8.30 च्या सुमारास नवजोत कौर आणि ममता या दोन मुली धन्नो वालीच्या गेटवरून रस्ता ओलांडण्यासाठी जात असताना अचानक फगवाडाच्या बाजूने येणाऱ्या वेगवान ब्रिजा कारने धडक दिली. कार चालवणारा ड्रायव्हर पोलीस कर्मचारी होता.
ही टक्कर इतकी भीषण होती की नवज्योत कौरचा जागीच मृत्यू झाला तर ममता गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर दोषी ड्रायव्हर घटनास्थळावरून पळून गेला. दोन्ही मुली धन्नो वाली गावाच्या रहिवासी होत्या आणि कोस्मो ह्युंदाई कंपनीत काम करत होत्या.