कृष्णेच्या पाणी पातळीत घट, अडीच फुटांनी उतरले पाणी - कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट
🎬 Watch Now: Feature Video
सांगली - कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याने नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळे सांगलीतील कृष्णा नदीची 23 फुटांवर पोहोचलेली पाण्याची पातळी आता वीस फुटांवर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून कृष्णा नदी पाणलोट क्षेत्र आणि जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत होती. गुरुवारी एकाच दिवसात कृष्णा नदीची पाण्याची पातळी सात फुटांवरून वीस फुटांवर पोहोचली होती. शुक्रवारी सकाळी पाण्याची पातळीही 23 फुटांवर पोहोचली होती. त्यामुळे कृष्णा नदीवरील 2 बंधारे पाण्याखाली गेले होते. मात्र, शुक्रवार सकाळपासून कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याने कृष्णेच्या पाणी पातळीत घट होऊ लागली आहे. सायंकाळी सहा वाजता सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी अडीच फुटांनी घटून 20.5 फुटावर पोहचली होती. मात्र, संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची आपत्ती यंत्रणा सज्ज झाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना नदीकाठच्या गावांना देण्यातआल्या आहेत.