ETV BHARAT SPECIAL - पाहा.. राज्यातील ओमायक्रॉन स्थितीचा आढावा घेणारा 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट - ओमायक्रॉन व्हेरिएंट बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - एकीकडे करोना प्रादुर्भाव कमी होतोय असे वाटत असतानाच नव्या ओमायक्रॉन नावाच्या (Omicron Variant) व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.यात महाराष्ट्रात 10 रुग्ण आढळून आलेत. मात्र, नागरिकांना आता चिंता करण्याचे कारण नाही.. कारण राज्यात आढळलेला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण पूर्णपणे बरा झालाय. आणि त्याला घरी सोडण्यात आलयं. असं असलं तरी. ओमायक्रॉनच्या निमित्ताने राज्य प्रशासन सज्ज झाले आहे. या विषाणूला रोखण्यासाठी विमानतळावर कोरोना टेस्ट, तसेच लसीकरणाचा वाढवलेला वेग (Increased Dose Of Vaccination) असे उपाय योजले जात आहेत. या निमित्ताने ओमायक्रॉन विषाणूबद्दल (Omicron Variant) जाणून घेऊया. आणि राज्यातर्फे ओमायक्रॉनला रोखण्यासाठी काय तयारी करत आहेत यावर एक नजर टाकूया