अबब! कुरियर बॉक्स उघडताच निघाला कोब्रा, पाहा व्हिडिओ.. - कुरियर बॉक्स नाग नागपूर
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - कुरियर बॉक्समधून साप निघाल्याची खळबळजनक घटना (cobra came out of Courier box) नागपूर शहरात घडली. ज्ञानेश्वर नगर येथील सेवानिवृत्त शिक्षक सुनील लखेटे यांच्या मुलीने वर्क फ्रॉम असल्याने बंगरुळूमध्ये असलेले किरायचे घर रिकामे करून कुरियरने घरगुती सामान नागपूरला बोलवले होते. तीन बॉक्स उघडल्यानंतर चौथा बॉक्स उघडण्याच्या तयारीत असताना सापाचा फुंकरण्याचा आवाज आला. त्यामुळे, तो बॉक्स घराबाहेर नेऊन उलटा केला असता त्यातून काळ कोब्रा (Courier box cobra) बाहेर पडला. यावेळी सर्पमित्र येईपर्यंत साप नालीच्या दिशेने निघून गेला.