पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये लता दीदींना श्रद्धांजली वाहण्यात आली - Dinanath Mangeshkar Hospital pune lata didi tribute
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सर्व रुग्णांनी सर्व त्यांच्या चाहत्यांनी त्यांना संदेश पत्र लिहून आदरांजली ( Tribute paid to Lata Didi at Dinanath Mangeshkar Hospital ) वाहिली. लतादीदींच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अनेक दिवे प्रज्वलित करण्यात आले. लतादीदींची गाणी अजरामर होती. त्यांची मराठी, हिंदी अशा प्रत्येक भाषेत गायलेली गाणी ही रसिकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडते. लता दीदींच्या जाण्याने संगित रसिक हळहळला. या श्रद्धांजली निमित्त दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर केळकर यांच्याशी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने बातचित केली.