VIDEO : एसटी कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन - पुणे एसटी आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
पुणे :- एसटी कर्मचाऱ्यांनी जे आंदोलन पुकारले आहे ते आंदोलन दिवसंदिवस चिघळताना दिसत आहे.आज (मंगळवारी) पुण्यातील शिवाजीनगर आगारातील कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न होऊन आंदोलन केलं आहे. उच्च न्यायालयात देखील एसटी कर्मचाऱ्यांचा विलनीकरणाचा तोडगा निघाला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी अर्ध नग्न होऊन आंदोलन केल आहे. शासनाने जो जीआर काढला आहे त्यात कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. वारंवार आम्हाला आश्वासने दिली जात आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील, अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. सत्तेतील तिन्ही पक्षांकडून फक्त आश्वासने दिली जात आहे. त्याच पद्धतीने भाजपाच्या वतीने देखील ते सत्तेत असताना आश्वासने देण्यात आली आहे. कोणीही आमची बाजू घेताना दिसत नाही. लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करा अशी मागणी देखील या कर्मचाऱ्यांनी केली आहे.