Union Budget 2022 - अर्थसंकल्प निराश करणारा, शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प ( Union Budget 2022 ) जाहीर केला. या अर्थसंकल्पावर आता राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया येऊ लागली आहे. हा बजेट सर्वसामान्य, मध्यम वर्गीय, यवक, महिला, नोकरदार वर्गाला निराश करणारा आहे. अर्थमंत्र्यांनी सर्व वर्गाच्या तोंडाला पाणी पुसले, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे ( Manisha Kayande react on Union Budget 2022 ) यांनी व्यक्त केली. गेली दोन वर्षे कोरोना आणि घसरणीला लागलेले अर्थचक्र, गमावलेल्या नोकऱ्या, कमी झालेले पगार, याचा विचार करून करदात्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, अर्थमंत्र्यांनी सर्व वर्गाच्या तोंडाला पाणी पुसले, असे मत कायंदे यांनी व्यक्त केले.
Last Updated : Feb 1, 2022, 8:36 PM IST