राणेंच्या 'त्या' विधानानंतर मुंबईतील भाजप कार्यालयाची सुरक्षा वाढविली
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी केलेल्या विधानाचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहेत. नारायण राणेंच्या विधानामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी नाशिकमधील भाजपच्या कार्यालयावर हल्ला केल्यानंतर मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याचा आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी..
राणेंचे विधान
'देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतंच नाही. ड्रायवरच नाही', असे विधान नारायण राणे यांनी केले होते.