VIDEO : पंतप्रधान मोदींनी मणिपुरी नर्सचे केले कौतुक, भारताने पार केला 100 कोटी लसीकरणाचा टप्पा
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - कोरोना महामारीविरूद्धच्या लढाईत भारताने एक महत्त्वपूर्ण टप्पा प्राप्त केला आहे. भारताने गुरुवारी 100 कोटी लसींच्या डोसचा ऐतिहासिक आकडा पार केला. कोविडच्या विरोधात नऊ महिन्यातच ही कामगिरी साध्य करण्यात आली आहे. 100 कोटी लसीच्या डोसचा आकडा पार केल्यावर देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. केंद्र सरकारने यानिमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरएमएल रूग्णालयातील मणिपुरी नर्सशी संवाद साधला. यावेळेस तिने कोरोना काळात बजावलेल्या सेवेचे कौतुक केले. तसेच कोरोना योद्धांचे आभार मानले.