पावसामुळे गांधी मैदानाचे झाले तळे; प्रशासनाचे दुर्लक्ष - कोल्हापूर लेटेस्ट
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - मंगळवारी सायंकाळी झालेल्या धुवांधार पावसामुळे कोल्हापूर शहरातील 'महात्मा गांधी मैदानाचे अक्षरशः तळे झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे. जेव्हा जोरदार पाऊस पडतो तेव्हा मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. आजूबाजूच्या परिसरातील गटारीचे पाणी सुद्धा मैदानात शिरते त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वारंवार महापालिकेला याबाबत कळवण्यात आले, मात्र तरीही याकडे कोणी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आता तत्काळ हा प्रश्न सोडविण्याची मागणी स्थानिकांनी आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्याकडे केला आहे.
Last Updated : May 6, 2021, 9:29 AM IST